गुरुवार, १९ मे, २०१६

रुद्रास आवाहन.... - भा. रा. तांबे

डुमडुमत डमरू ये, खणखणत शूल ये,
शंख फुंकत ये, येई रुद्रा !

प्रलयघनभैरवा, करीत कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे, कृद्ध मुद्रा !

कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,

मांड वादळ, उधळ गिरी जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे, या समुद्रां !

पाड सिंहासने, दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनी, मत्त नृप खालती,

मुकुट रंकास दे, करटी भूपाप्रती,
झाड खटखट तुझें,खड़ग क्षुद्रां !

जळ तडागं सडे, बुडबुडे, तडतडे
"शांति ही!" बापुडे, बडबडति जन-कीडे !

धडधडा फोड तट ! रुद्र ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि, उजळ भद्रा !

पूर्वी नरसिंह तूं, प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयीं अन्य गृहीं,दरवडे पाडिले,

बनुनि नृप, तापुनी चंड,
जन नाडिले, दे जयांचें तयां वीरभद्रा !



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा