बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

निळा‌ई..... - ग्रेस

असे रंग आणि ढगांच्या किनारी
निळे ऊन लागे मला साजणी
निळे घाटमाथे निळ्या रा‌उळांचे
निळा‌ईत माझी भिजे पापणी

निळ्याशार मंदार पा‌उलवाटा
धुक्याची निळी भूल लागे कुणा
तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू
निळ्या अस्तकालीन नारायणा

निळे गार वारे जळाची शिराणी
निळ्या चंद्र‌ओवीत संध्या डुले
निळे दुःख चोचीत घे‌उन आली
निळ्या पाखरांची निळी पा‌उले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा