"येशी सांग कुठून ? दिव्य कविते ! हे चित्कले सुंदरी?"
-- गा तेथून कवे ! अनंत निजला जेथें तुझ्या अंतरीं !
"तेथे शांति अगोचरा, मग मुखीं वाणी कशी सुस्वर?"
-- बन्सी देह मदीय, नित्य घुमवी श्वासेंच बन्सीधर

"ही ज्योतिर्मय भूषणें तनुवरी, कोणीं दिलीं आंदण?"
-- देहातील तुझ्या युगानुयुग जे, ती श्री तिचें हें धन

"केवीं आकळिशी अनंत गगनें पंखांविणें सत्वर?
कोठें पुण्यजलाशयी विहरुनी येशी क्षणाभीतर?"
-- गेले मानसहंस दिव्य उडुनी, त्यांनी दिले जे परशीर्षींचे वर
ते तुझ्या, जडवुनी मीं नेसलें अंबर

तेणें मी उडुनी जिथें अतिरसीं न्हातात व्यासादिक
तेथें शांत मनें विहार करितें मानून पुण्योदक

"केवीं गे मग साश्रु लोचन तुझें, जेव्हा मुदें हांसशी डोळ्यांनी ?
हसतां, मुखावर कशी संध्याद्युति म्लानशी?"
-- रात्रीचा घन कृष्णकोष फुलतां तेजास येई भर
छाया भूमिवरी जशा पसरती जेंव्हा हसे भास्कर
लीला त्याचपरी करोनि तुजला मी प्रत्यहीं दावितें
कीं जें सत्य चराचरी विनटलें तूझेंच उद्बीज तें

"केवीं चिन्मय मोहिनी असुनिं तूं निर्लेप मांगल्य ही?"
-- मी भस्मासुर जाळितें हसुनियां नाचून गाऊनही

"मी गे अज्ञ असून केविं असशी तूं मात्र विद्यावती?"
-- भ्रांती तू मम, मी तुझी कविवरा ज्योतिष्मती जागृती !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा