बुधवार, ६ सप्टेंबर, २०१७

असे काही तरी व्हावे... - बा.सी.मर्ढेकर

असे काही तरी व्हावे
अशी दाट होती इच्छा;
असे काही तरी झाले
पुरवितें तेंच पिच्छा

पैलथडी पिके अंबा
ऐलथडी हे शहारे
कुणा भाग्यवंतासाठी
मध्ये वाकतात वारे

ओल्या वाळूंतुन वर
येई रसाळ सुवास;
आणी मनांतील बिया
देती हळूच आळस

असे काहीसे होईल
अशी होती फार आशा;
असे काहीसे झालेले
पाहतांच थिजे भाषा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा