गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

आठवण..... - ग्रेस

या व्याकुळ संध्यासमयी
शब्दांचा जीव वितळतो,
डोळ्यात कुणाच्या क्षितिजे
मी अपुले हात उजळतो.

तू आठवणीतून माझ्या
कधी रंगीत वाट पसरशी,
अंधार व्रताची सम‌ई
कधी असते माझ्यापाशी.

पदराला बांधून स्वप्ने
तू एकट संध्यासमयी,
तुकयाचा हातांमधला
मी अभंग उचलून घे‌ई.

तू मला कुशीला घ्यावे
अंधार हळू ढवळावा,
सन्यस्त सुखाच्या कांठी
वळीवाचा पा‌उस यावा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा