पानं फाटलेली :
वार्याचे सारे अतिप्रसंग सहन केलेली.
पानं भुईवर विखुरलेली :
झाडानेच अपरात्री घराबाहेर काढलेली.
पानं मूक, स्तब्ध :
अतर्क्य उत्पातात वाचा गमावून बसलेली.
पानं हीन-दीन :
कुणावरही सावली धरण्याची पुण्याई संपलेली.
पानं असहाय्य :
सीतेसारखी शेवटी मातीच्या गरीब आश्रयाला आलेली. . .
वार्याचे सारे अतिप्रसंग सहन केलेली.
पानं भुईवर विखुरलेली :
झाडानेच अपरात्री घराबाहेर काढलेली.
पानं मूक, स्तब्ध :
अतर्क्य उत्पातात वाचा गमावून बसलेली.
पानं हीन-दीन :
कुणावरही सावली धरण्याची पुण्याई संपलेली.
पानं असहाय्य :
सीतेसारखी शेवटी मातीच्या गरीब आश्रयाला आलेली. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा