किती जिवलग असते
एखाद्या सुंदर अनुच्चारीत गोष्टीचे
आपल्यासोबत दूरवर येणे!
किती अवघड असते!
आपल्यासोबत दूरवर येणे!
किती अवघड असते!
उच्चारणाहूनही लोभस
असतात कधी कधी उच्चारवाचे आभास
जिवापासचा भुलवा घमघमत उठवायचा
अन पुन्हा तो कल्लोळ जिवापाशीच रोखायचा
हळूहळू नादच जडतो या प्राणांतिक आनंदाचा
ओठ हलवायचा, थांबवायचा
शब्द मनवायचा, मिरवायचा
शब्द मनवायचा, मिरवायचा
उन्हात धरलेल्या बोटामधून झिरपावा लाल उजेड,
तसा त्या अस्तित्वाचा लोभ पसरत राहतो.
अन् कोरांटीच्या तळामधला चुपावासा मध,
तसा जगण्याच्या मुळाशी
थेंब थेंब गोडवा साठत जातो.
अनुच्चारीत ही कविता अरूणा ढेरे यांची आहे...शांता शेळके यांची नाही...कृपया बदल करावा
उत्तर द्याहटवाअनुच्चारीत ही कविता अरूणा ढेरे यांची आहे...शांता शेळके यांची नाही...कृपया बदल करावा
उत्तर द्याहटवा